‘त्या’ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी न केल्यास करणार आत्मदहन

Imran Mulla
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड पालिकेतील मुख्यधिकारी यांच्यासह शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांच्या कामाची व त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास 19 रोजी आत्मदहन करू असा थेट इशारा निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना मुल्ला यांनी दिला आहे.

यावेळी मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, कराड पालिका शाळा क्रमांक 3 चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी, कराड नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन जगताप, कराड पालिकेतील अकाउंटंट विभागातील अधिकारी रवी ढोणे, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, पालिकेचे सेवानिवृत्त बांधकाम अभियंता एम. एच. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात यावे.

अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीच्या निवेदनाचा विचार झाला नाही तर 19 रोजी बेमुदत प्राणांतिक उपोषण केले जाईल. तसेच उपोषण स्थळी कोणताही पत्रव्यवहार न करता आत्मदहन करू आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची राहील, असे इम्रान मुल्ला यांनी निवेनात म्हंटले आहे.