औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी सरशी करत लोकसभा गाठली. त्यानंतर आज काल पहिल्यांदीच जलील आणि चंद्रकांत खैरे आमने सामने आल्याचे पाहण्यास मिळाले.
इम्तियाज जलील समोरून येताच चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे हासत स्वागत केले. तसेच जलील यांच्या खांद्यावर हात टाकून खैरे यांनी आपुलकीने विचारपूर केली. दोन कडवे विरोधक एकत्र आल्याचे पाहून औरंगाबादकरांच्या चेहऱ्यावर देखील आनंद तरळल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच खैरे आणि जलील एकत्रित आले होते.
औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहन सोहळ्यासाठी इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे उपस्थित होते. यावेळी दोघांची भेट झाली. या भेटी दरम्यान जलील देखील खळखळून हसले.