व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

देशात एका दिवसात 2,69,507 रुग्णांची कोरोनावर मात, मात्र 3,645 मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मागील 24 तासात देशात तीन लाख 79 हजार 257 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चिंताजनक बाब म्हणजे उच्चांकी 3,645 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून मागील 24 तासात 2 लाख 69 हजार 507 रुग्णांना कोरोनावरील उपचार करून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान नव्याने वाढलेल्या रुग्णांवर देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात एक कोटी 50 लाख 86 हजार 878 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत दोन लाख 4 हजार 832 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या देशात तीस लाख 84 हजार 814 जणांवर कोरोनावरील उपचार विविध रुग्णालयांमध्ये सुरू आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात आज लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या एक मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण केले जाणार आहे. काही राज्यांमध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. आतापर्यंत देशात 15,00,20,648 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.