औरंगाबादेत ओमिक्रॉनच्या एका रुग्णाची वाढ तर परभणी जिल्ह्यातही झाला शिरकाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबादेत काल एका रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निदान झाले असून, परभणी जिल्ह्यातली ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांचे निदान झाले आणि मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्याचा ओमायक्रॉनच्या यादीत समावेश झाला आहे. याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंत आढळलेल्या एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 20 झाली आहे. तर मराठवाड्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 42 झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवसात 14 ओमायक्रॉन रुग्णांचे निदान झाले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसात हे रुग्ण कोरोनामुक्त आणि ओमायक्रॉन मुक्त देखील झाले आहेत. औरंगाबाद सह यापूर्वी उस्मानाबाद, जालना, लातूर आणि नांदेड येथे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत. आता परभणीतही दोन ओमायक्रॉन रुग्णांचे निदान झाले आहे.

मराठवाड्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या –
औरंगाबाद – 20
उस्मानाबाद – 11
लातूर – 3
नांदेड – 3
जालना – 3
परभणी – 2

Leave a Comment