औरंगाबाद: उस्मानपुरा, कबीरनगर या ठिकाणी असलेल्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये दोन दिवसांपूर्वी त्यांनी चक्क ओली पार्टी केल्याचे बुधवारी उघडकीस आले आहे. या आरोग्य केंद्रातील छोट्या-मोठ्या वस्तू ही चोरट्यांनी लांबवल्याचे दिसत आहे. अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.
केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून कबीर नगरात महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी आरोग्यकेंद्र बांधले होते. बांधकाम पूर्ण झाल्यावर सुद्धा ते आरोग्य केंद्र बंदच होते. दोन दिवसांपूर्वी या आरोग्य केंद्रात चोरी झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला समजली असता बुधवारी अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्राचा दरवाजा तोडला असल्याचं निदर्शनास आले.
काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात ओल्या पार्ट्या देखील केल्याचे स्पष्ट झाले. खिडकीचे ग्रिल्स नळाच्या तोट्या सुद्धा चोरीला गेल्याचं यावेळी लक्षात आलं. आता सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
आठ दिवसात ओपीडी
कबीरनगरातील आरोग्य केंद्र एक दीड वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे परंतु कोरोना काळामुळे ते सुरू करण्यात आलेले नाही. कबिर नगरातील आरोग्यकेंद्र एक दीड वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे पण करू नका काळामुळे कोरोना काळामुळे सुरू करण्यात आले नव्हते याचाच गैरफायदा घेऊन ओली पार्टी आणि काही छोट्या मोठ्या वस्तू चोरल्याची घटना घडली आहे. काही मंडळींनी आरोग्य केंद्राची दारे-खिडक्या तोडल्याची माहिती समोर आहे. यामुळे येत्या आठ दिवसात या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरु करुन ओपीडी ची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर दोन सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी दिली.