PNB ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! बँकेच्या ‘या’ सर्व्हिसमध्ये अडथळा आला आहे, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल आणि आपण इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. PNB ग्राहकांना UPI मार्फत ऑनलाईन बँकिंग, पैशांच्या व्यवहारात अडचणी येत आहेत. बँकेने आता यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. PNB ने ग्राहकांना येणाऱ्या अडचणींबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह, बँकेने आपल्या ग्राहकांना हे व्यवस्थित केले जात असल्याचे आश्वासन दिले आहे.

PNB काय म्हणाले ते जाणून घ्या
वास्तविक ट्विटरवर PNB च्या एका ग्राहकाने बँकेला टॅग करताना म्हटले होते की त्यांचे नेट बँकिंग काम करत नाही आहे. ग्राहकाच्या या ट्विटवर PNB च्या अधिकृत अकाउंट वरून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बँकेने त्याला टेक्निकल इश्यू सांगताना म्हटले आहे की, ‘प्रिय ग्राहकांनो, तुम्हांला होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या (Internet Banking, UPI, APP) सेवांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे समस्या येत आहेत. तथापि, आमची टीम यावर काम करत असून लवकरच त्याचे निराकरण केले जाईल.

PNB सेव्हिंग अकाउंटवर मोठा रिटर्न
जर आपण सुरक्षित मार्गाने पैसे कमावण्याचा विचार करीत असाल तर आपण बचत खात्याद्वारे (Savings Accounts) पैसे कमवू शकता सध्या पंजाब नॅशनल बँक आपल्या बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देत आहे. PNB चा व्याज दर 3% ते 3.50% आहे, त्यात किमान शिल्लक मर्यादा 500 ते 2000 रुपये आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment