दहिवडी | दहिवडी नगर पंचायतीसाठी सोमवारी फेर आरक्षण सोडत झाली. यामध्ये विद्यमान नगराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांचे मतदारसंघ राखीव झाले आहेत. अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची झाली आहे. तर खुल्या मतदारसंघात चुरस निर्माण झालेली आहे.
दहिवडीमध्ये 17 प्रभाग असून प्रत्येक प्रवर्गातून एक नगरसेवक निवडून द्यायचा आहे. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अवधूत कुंभार, कावेरी कदम यांच्यासह अधिकारी कर्मचारी व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दहिवडी नगर पंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
1 – इतर मागास प्रवर्ग
2 – सर्वसाधारण महिला
3 – सर्वसाधारण महिला
4 – सर्वसाधारण
5 – सर्वसाधारण
6 – इतर मागास प्रवर्ग पुरुष
7 – सर्वसाधारण महिला
8 – सर्वसाधारण महिला
9 – सर्वसाधारण महिला
10 – सर्वसाधारण महिला
11 – अनुसूचित महिला
12 – सर्वसाधारण
13 – सर्वसाधारण
14 – नागरिकांचा मागास प्रवर्ग
15 – अनुसूचित जाती पुरुष
16 – सर्वसाधारण
17 – नागरिकांचा मागास प्रवर्ग