नवी दिल्ली । भारतात दिवसेंदिवस पेट्रोल महाग होत चालले आहे. या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. देशातील करप्रणाली हे या महागाईचे मुख्य कारण आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात प्रत्येक राज्यात वेगवेळ्या प्रकारचे कर आहेत. त्यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्ही संस्थांकडून वेगवेगळे कर आकारले जातात. याच कराणामुळे भारतात पेट्रोल महाग झाले असून इंधन दराने शंभरी पार केली आहे.
देशात सर्वात महाग इंधन राजस्थानमधील श्रीगंगानगरात आहे. श्रीगंगानगरमध्ये सध्या पेट्रोलचा दर 97.76 रुपये प्रतिलीटर आहे. तर प्रिमियम पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असून सध्या दर 100.51 प्रतीलीटरवर पोहोचला आहे. तर दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी वाढले असून सध्या पेट्रोल 86.05 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. तर, मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी महागले असून पेट्रोलचा दर 92.62 रुपयांवर पोहोचला आहे. स्थानिक करप्रणालीनुसार हे दर ठरतात. त्यामुळे आपल्याला राज्यांतर्गत तसेच शहरांतर्गतसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार दिसत आहे.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये पेट्रोल कित्येक टक्क्यांनी स्वस्त आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये पेट्रोल 40 ते 45 टक्के स्वस्त आहे. येथे सध्या पेट्रोलचा दर 49.87 रुपये प्रतिलीटर आहे. तर व्हेनेझुएला देशात पेट्रोलची किंमत दोन रुपयांपेक्षाही कमी झाली आहे. येथे पेट्रोल 1.46 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. डॉलरमध्ये सांगायचे झाल्यास हा दर फक्त 0.02 डॉलर एवढा आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’