अवघ्या 2 दिवसात Latent View चा स्टॉक 3 पटीने वाढला, IPO मिळवणारे झाले मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ज्याला Latent View Analytics चा IPO मिळाला त्याची दिवाळी झाली. या शेअर्सने अवघ्या दोनच दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत. हा स्टॉक 23 नोव्हेंबर रोजी त्याच्या इश्यू प्राईसच्या 200 टक्के वर उघडला. त्याची इश्यू प्राईस ₹ 197 होती आणि लिस्टिंग ₹ 512 मध्ये झाली. Latent View Analytics चा शेअर 24 नोव्हेंबर रोजी 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला पोहोचला आणि 586 रुपये 50 पैशांवर थांबला. जर आपण त्याच्या इश्यू प्राईसशी तुलना केली तर हा स्टॉक जवळजवळ तिप्पट झाला आहे.

23 नोव्हेंबर रोजी ग्लोबल डेटा अँड एनालिटिक्स कंपनीच्या या स्टॉकमध्ये 148 टक्के वाढ झाली होती. तो 512 वर उघडला आणि 488 रुपयांवर बंद झाला. 24 नोव्हेंबरला Latent View चा शेअर 499 रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर दिवसभर या स्टॉकमध्ये खरेदी होत राहिली. शेवटी, शेअर 20 टक्क्यांच्या वाढीसह तो 586.50 रुपयांवर बंद झाला.

हा स्टॉक इतक्या वेगाने का वाढत आहे?
या शेअरच्या आर्थिक बाबतीत कोणतीही अडचण नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कंपनीचा व्यवसाय चांगला असून भविष्यात या व्यवसायात भरपूर वाव आहे. याशिवाय कंपनीचे चांगले आणि मोठे क्लायंट आहेत, त्यामुळे कंपनीचा हा व्यवसाय जास्त पसरताना दिसत आहे. यामुळेच मोठे गुंतवणूकदारही या शेअरमध्ये खरेदी करण्यास उत्सुक आहेत.

Latent View बिझनेस एनालिटिक्स मध्ये डील करते आणि त्याच्या क्लायंटना एडवांस प्रिडिक्टिव एनालिटिक्स देते. ही जागतिक स्तरावर डेटा अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या 3 वर्षांत, LatentView ने Fortune 500 कंपन्यांचा भाग असलेल्या 30 कंपन्यांसोबत काम केले आहे.

आता पुढे काय?
या क्षेत्रातील सल्लागार लेटेंट व्ह्यूच्या स्टॉकला Happiest Mind सारखेच मानतात. Happiest Mind हा देखील असाच एक स्टॉक आहे, ज्याने सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना अनेक पटींनी पैसे दिले आहेत. हे तज्ञ Latent View Analytics stock मध्ये वाढ पाहत आहेत आणि ते कंपनीच्या कामामुळे आहे. कंपनी सतत नफा मिळवत आहे आणि आपले काम वाढवत आहे.

Leave a Comment