कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला, कारसुद्धा पेटवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी सामाजित कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला करून त्याच्या दारासमोरील कारची तोडफोड करून पेटवून देण्यात आली आहे.तब्बल अर्धा तास हल्लेखोरांनी धुडगूस घातला होता. ही सर्व घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशा प्रकारे हल्ला करण्याची गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. फुलेवाडी रिंग रोड परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.

घरावर दगडफेक करत कार पेटवली
सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई हे परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. यामुळेच अवैध धंदेवाल्यांचा त्यांच्यावर प्रचंड राग होता. याच रागातून दोन दिवसांपूर्वी देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता शिंगणापूरमधील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील देसाई यांच्या कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.

यावेळी हल्लेखोरांनी देसाई यांच्या कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक केली तसेच त्यांच्या कारची तोडफोड करत ती पेटवण्यात आली. या हल्लेखोरांनी मध्यरात्री तब्बल अर्धा तास धूडगूस घातला होता. हल्लेखोर कार पेटवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा

राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???

आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

Leave a Comment