Wednesday, October 5, 2022

Buy now

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देवळाली कॅम्पमध्ये दोघा मायलेकींनी रेल्वे खाली उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे अशी या आत्महत्या (Sucide) करणाऱ्या मायलेकींची नावे आहेत. देवळाली कॅम्पमध्ये शिरोळे कुटुंब वास्तव्यास आहेत. मृत अनिता शिरोळे यांचे पती रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार आहेत. ते काही कामानिमित्त सोलापूरला गेले होते. त्यानंतर या मायलेकी दोघीचं घरात होत्या. यानंतर या दोघांनी अचानक मुंबई-नाशिकरोडकडे असलेला रेल्वेमार्ग गाठला आणि गीतांजली एक्सप्रेस खाली उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली.

कारण अद्याप अस्पष्ट
या मायलेकीनी आत्महत्या (Sucide) का केली याबाबत कोणतंही ठोस कारण पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराम मायलेकीनी गीतांजली एक्सप्रेस पुढे आत्महत्या (Sucide) केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मृत राखी शिरोळे हि महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तसेच त्यांची मोठी मुलगी विवाहीत आहे.

अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे या दोघीचं घरी होत्या. दोघींनी अचानक असे पाऊल का उचलले यामुळे पोलिसदेखील चक्रावून गेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

1 जून पासून पुन्हा वाढू शकतात एलपीजीच्या किंमती !!!

आई तुळजाभवानी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे…, अख्खा पक्ष घेऊन दर्शनाला येईन; सुप्रिया सुळेंनी घातलं साकडं

Hat’s Off महाराज : छ. उदयनराजेंच्या नव्या व्हिडिओला जोरदार कमेंट

ATM Card हरवले ??? कार्ड कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

…म्हणून आम्हीही बेरीज करत राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया