नवी दिल्ली । देशभरात कोरोना संक्रमणाचा वेग कायम असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे. देशभरातील एकूण १४ लाख ८३ हजार १५७ कोरोनाबाधितांमध्ये ४ लाख ९६ हजार ९८८ अक्टिव्ह रुग्ण, उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेले ९ लाख ५२ हजार ७४४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३३ हजार ४२५ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल आहे. देशात मागील २ दिवसात तब्बल १० लाखांपेक्षा अधिक नमूने तपासणी झाली आहे. यामध्ये २६ जुलै रोजी ५ लाख १५ हजार व २७ जुलै रोजी ५ लाख २८ हजार नमूने तपासण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली आहे.
कोरोनाचा उद्रेक झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे. भारतात १९ दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून भारतात दिवसाला ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, दिवसभरात सर्वाधिक रुग्णांच्या उच्चांकी नोदींपासून भारत केवळ ५ हजारांनी दूर आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”