नवी दिल्ली । भारतात कोरोना संक्रमणाचा वेग झपाट्यानं वाढला आहे. गेल्या २४ तासात आतापर्यंतची दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळण्याच्या उचांकी वाढ नोंद झाली आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे.
३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत७ लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.
गेल्या २४ तासांमध्ये २३ हजार ६७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ७ लाखांपेक्षा जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ६२.८६ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. सध्या देशात १० लाख लोकसंख्येमागे सुमारे १० हजार चाचण्या केल्या जात आहेत, असेही सांगण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”