सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 292 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 32 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 256 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 16 हजार 534 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 90 हजार 484 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2700 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोमुक्तीचा व बाधितांचा आकडा जवळपास समसमान असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिवसभरात 2 हजार 32 रूग्ण बरे होवून घरी गेले, जिल्ह्याला दिलासादायक बातमी आहे. तर बुधवारी रात्री नव्याने केवळ 2 हजार 292 बांधितांच्यामुळे जिल्ह्यातील सर्वात रेकाॅर्डब्रेक आकडे थांबले नसल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. तर मंगळवारी दिवसभरात 58 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba
Click Here to Join Our WhatsApp Group