सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात गेल्या दोन-तीन महिन्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात सध्य स्थितीत 430 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर 27 गावांनी कोरोनाचा शिरकाव होवू दिला नाही. यामध्ये पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येकी 9 गावांचा समावेश आहे. या गावांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले असून इतर गावांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिरूध्द आठल्ये यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वच भागात कोरोनाचा शिरकाव झालेला पहायला मिळाला आहे. कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक गावांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करून कोरोनाला गावातून हद्दपार केले. परंतु सातारा जिल्ह्यात आजही 27 गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, त्यांनी कोरोनाला गावच्या वेशीबाहेरच ठेवण्यात यश मिळविले आहे. गावातील सामुहिक प्रयत्नामुळेच हे शक्य झाले आहे. या गावांचा आदर्श इतरांना घेणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव नसलेली 27 गावे खालीलप्रमाणे
पाटण तालुका (9) : नेचल, नानेल, पाचगणी, काहिर, वाडीकोतावडे, भांबे, पाळशी, पाणेरी, सातर, महाबळेश्वर तालुका (9) : आमशी, रामेघर, शिंदी, वलवन, आकल्पे, निवळी, आरव, मोरणी, उचाट, सातारा तालुका (4) : वेणेखोले, सावली, वडगांव, पुनवडी, जावली तालुका (4) : गोंदेमाळ, कारगाव, भालेघर, कोळघर, वाई तालुका (1) : ओहळी