सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 570 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 555 लोकांना कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 9 हजार 694 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 5.88 टक्के इतका आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 813 झाली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 9 हजार 161 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 95 हजार 684 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 43 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 29 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोना संपलेला नाही. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने गावामध्ये रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. हळू हळू रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.




