सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे
सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 588 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 256 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 8 हजार 967 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.56 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 165 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 14 हजार 659 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 680 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 150 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 14 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
कालपर्यंत मृत्यू झालेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे.
जावली (195), कराड (1002), खंडाळा (160), खटाव (504), कोरेगांव (398), माण (293), महाबळेश्वर (86), पाटण (322), फलटण (501), सातारा (1303), वाई (315) व इतर (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5150 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.