सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज बुधवारी दि. 11 रोजी संध्याकाळपर्यंत 664 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
आजपर्यंत एकूण 15 लाख 26 हजार 454 नमूने घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2 लाख 26 हजार 728 एकूण बाधित आढळले आहेत. तर 2 लाख 14 हजार 292 नागरिकांना घरी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 5 हजार 504 जणांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. एकूण 10 हजार 85 जण उपचारार्थ आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 622 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 31 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात
जावली 28 (9544), कराड 109 (36328), खंडाळा 26 (13384), खटाव 53 (22534), कोरेगांव 37 (19765), माण 49 (15473), महाबळेश्वर 0 (4542) पाटण 16 (9732), फलटण 114 (32206), सातारा 127 (46737), वाई 51(14765) व इतर 12(1718) असे आज अखेर एकूण 226728 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. तसेच आज 31 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5504 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.