थोडा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 801 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 9 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे 

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 801नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 9 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 153 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7.16 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 895 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 6 हजार 967 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 92 हजार 848 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 986 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 20 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कराड तालुका हाॅटस्पाॅट, प्रशासन अपयशी

बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये कराड तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त 247 बाधित आढळून आले. तर जिल्ह्यातील एकूण 20 मृत्यूपैकी 13 मृत्यू हे कराड तालुक्यातील बाधितांचे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा हाॅटस्पाॅट हा कराड तालुका होत आहे. मात्र तरीही प्रशासन कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असतानाचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Comment