सातारा जिल्ह्यात 24 तासांत 838 पॉझिटिव्ह तर 17 रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे काहीसा दिलासा मिळेल असे वाटले होते. मात्र, आज पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी हाती आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 838 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली असून काल दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यापैकी सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतंय. त्यातील सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असून ते कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण वाढत आहे. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या एकूण 1 लाख 81 हजार 999 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात आज अखेर 10 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आजपर्यंत 4 हजार 65 इतक्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि आज अखेर 1 लाख 68 हजार 9 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा ????????????????????????
https://chat.whatsapp.com/BtZpBtKLG0CFnHvKvQhssN

Leave a Comment