सातारा | सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 856 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 244 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 12 हजार 771 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.7 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 9 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 31 हजार 654 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 17 हजार 578 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 603 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 11 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय रविवारी रात्रीपर्यंत कोरोना बाधितांची संख्या तर रविवारी अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात.
जावली 17 (9647), कराड 60 (36870, खंडाळा 18 (13543), खटाव 85 (23136), कोरेगांव 51 (20077), माण 69 (15927), महाबळेश्वर 2 (4552) पाटण 5 (9800), फलटण 84(32989), सातारा 139 (47539), वाई 36(14968) व इतर 3(1750) असे आज अखेर एकूण 230798 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.