सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 887 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 176 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 8 हजार 713 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 10.18 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 887 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 11 हजार 791 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 97 हजार 732 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 102 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 14 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या रिपोर्टमध्ये बाधितांचा आकडा वाढत आहे. तर कोरोनामुक्त होणारे कमी आहेत. त्यातच पाॅझिटीव्ह रेट पुन्हा 10 टक्क्यांपेक्षा अधिक आल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाचा सामना कसा करणार हा प्रश्न सर्वसमान्य लोकांच्यापुढे आहे.