सातारा | राज्यासह देशात पेट्रोल व डिझेल दरवाढीचा दररोज नवनवीन उंच्चाक दरवाढीने होताना पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात गुरूवारी डिझेल 16 पैशांनी तर पेट्रोल 32 पैशांनी वाढलेले आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल 107. 91 तर डिझेल 96. 36 रूपयांवर गेलेले आहे.
पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आहे. या दरवाढीचा सर्वच घटकांवर परिणाम झाल्याचे बाजारपेठेत पहायला मिळत आहे. पेट्रोलने शंभरी पार करून 108 रूपयांकडे गेला आहे. तर डिझेलही शंभरीकडे गेलेले आहे.
राज्यातील व केंद्रातील सरकारमध्ये या पेट्रोल व डिझेल तसेच गॅस दरवाढीवरून चांगलेच आरोप- प्रत्यारोप होत आहेत. राज्यातील सरकार आंदोलन करत आहे. मात्र पेट्रोल- डिझेल व गॅसची दरवाढ दिवसेंन दिवस वाढत असल्याचेच समोर दिसत आहे. सातारा जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या दरवाढीने आजपर्यंतचा नवा उंच्चाक गाठला आहे.