सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 1 हजार 71 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 756 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 12 हजार 732 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 8.41 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 195 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 17 हजार 304 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 3 हजार 924 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 229 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 46 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
काल रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी बाधितांच्यात वाढ झालेली आहे. पाॅझिटीव्ह रेटही वाढलेला असून परिस्थिती सुधारत असताना चिंताजनक वाढ झाली आहे. जिल्ह्यात प्रशासन पाऊस, पूर आणि कोरोना या तिन्ही संकटांशी सामना करत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी केव्हा होणार हा प्रश्न प्रशासनापुढे उभा आहे.