साताऱ्यात पत्नीच्या बेडरूममध्ये छुपा कॅमेरा अन् पुढे घडले असे

0
1143
Satara Bedroom Camera
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पत्नीच्या बेडरूमध्ये छुपा कॅमेरा लावून पतीने व्हिडिअो शूटींग केल्याची घटना समोर आली आहे. गाडी घेण्यासाठी पैशाचा तगादा लावून छळ करत पत्नीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पतीविरुद्ध जाचहाटासह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 2014 पासून ते 2 नोव्हेंबर 2022 या कालावधीत वेळोवेळी घडली असल्याचे तक्रारीत पत्नीने म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतीने वारंवार पत्नीकडे पैशांची मागणी केली, तसेच पतीचे विवाहबाह्य संबंधाबाबत विचारणा केली असता, संशयित पतीने मुलांना विष देवून जीव देवून तक्रारदार पत्नी व तिच्या वडीलांना जेलमध्ये पाठवू अशी धमकी दिली. तक्रारदार पत्नी ज्याठिकाणी काम करते त्याठिकाणी दंगा करण्याची दमदाटी केली. बेडरुममध्ये छुपा कॅमेरा लावून व्हिडीओ करुन मानसिक व शारिरीक छळ केला असल्याचे तक्रारीत पत्नीने म्हटले आहे.

या सर्व कृत्यामुळे पती व पत्नीमध्ये अनेकदा वाद विकोपाला गेले. छळ सुरुच राहिल्याने अखेर पत्नीने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस करत आहेत.