शिंदे- फडणवीस सरकार कधी पडणार? अजित पवारांनी सांगितलं राजकीय लॉजिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांकडून सातत्याने हे सरकार पडणार असं भाकीत केलं जात होत. अखेर अडीच वर्षानंतर ठाकरे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे- फडणवीसांचे सरकार आलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिरांनंतर शिंदे सरकार पडेल असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे, त्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी सरकारच्या भवितव्याबद्दल बोलताना राजकारणातील लॉजिक सांगितलं .

शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जोपर्यंत १४५ आमदार आहेत , तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पार पडल्यांनंतर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार पडेल असं जयंत पाटील म्हणाले होते. मागच्या वेळी शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन एक अधिवेशन पार पडलं. अन् महाविकास आघाडी सरकार पडलं. आताही आमचं अधिवेशन झाल्यावरच सरकार पडेल. देवाला काय माहीत कुणाचं सरकार आहे. त्याने सरकार पाडलं. आता आमचं अधिवेशन झालं तर राज्यातील सरकार पडेल असा दावा जयंत पाटील यांनी केला होता.