सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील विसावा नाका येथे काही प्रवाशांना घेवून वाहतूक बस (क्रमांक एमएच- 14- बीटी- 4731) काही लोकांनी थांबविली. या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे, या बसमध्ये वाहक व चालक नसल्याचे दिसून आले. यावेळी बसच्या चालकांच्या सीटवर बसलेला व्यक्ती हा विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी होता. ड्युटी संपल्यावर नियमबाह्य पध्दतीने प्रवासी वाहतूक करत बस घेवून जाणाऱ्या या व्यक्तीमुळे बसमधील प्रवाशांच्यात खळबळ उडाली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी असलेली एकाने आपली ड्युटी संपल्याने चक्क बस घेवून प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. सातारा आगारातून ही बस कराडच्या दिशेने चाललेली होती. शहरातील विसावा नाका येथे प्रवाशांनी बसला हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटी चालकांनी एसटी न थांबवल्याने त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला. यावेळी गाडीमध्ये चौकशी केली, तेव्हा अजब प्रकार उघडकीस आला.
एसटी बसमध्ये प्रवासी होते. मात्र वाहक आणि चालक नसल्याचं निदर्शनात आले. यावेळी चालकांच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसल्याची बाब समोर आली. त्याने पाटण आगाराची आणि कराड आगारातील प्रवासी एसटी मध्ये घेऊन वाहतूक करत असल्याचे निदर्शनात आले. ही बाब जेव्हा समोर येताच संबंधित चालकाने माफी मागून गाडी सोडण्याची विनंती केली. यावेळी काहीकाळ शाब्दिक चकमक उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन्ही गाडीच्या चालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे..