सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवानी ताई कळसकर यांच्या माध्यमातून ही ॲम्बुलन्स नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲम्बुलन्समुळे प्रभाग 5 मधील रहिवाशी नागरिकांना वैद्यकीय सोयी- सुविधा मिळविण्यासाठी ये- जा करण्यासाठी लाभ मिळणार आहे.
ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यास छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनील काटकर, माजी नगरसेवक राम हादगे, निशांत पाटील, किशोर शिंदे, एॅड. बनकर, प्रीतम कळसकर, शिवानी कळसकर यांच्यासह प्रभाग 5 मधील रहिवाशी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, समाजात प्रत्येकजण काही काही कार्य करत असतो. परंतु आज कोरोना आला, त्यानंतर वेगवेगळे रोग आले आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. अशावेळी सर्वात महत्वाची गरज ही आरोग्यसेवा ही होती. आजही पावसाळा सुरू झाला आहे, अशावेळी अनेक साथीचे तसेच छोटे- मोठे आजार उदभवत असतात. अशावेळी दवाखान्यात ने- आण करण्यासाठी शिवानी कळसकर यांनी ॲम्बुलन्स उपलब्ध करून एक सामाजिक वसा जोपासला आहे. तेव्हा साताऱ्यात प्रत्येक प्रभागात अशा पध्दतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.