लॉकडाउन सुरू झाल्यापासून कोरोनासंदर्भांतील १ लाख ४१ हजार गुन्हांची नोंद- गृहमंत्री अनिल देशमुख

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ४१ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात २२ मार्चला लॉकडाउन सुरु झाल्यापासून ते २ जुलै या कालावधीत दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये २९,५५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे कलम १८८ नुसार दाखल करण्यात आल्याची अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. याशिवाय लॉकडाऊन काळात विविध गुन्ह्यांसाठी १२ कोटी २५ लाख ११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ४८ हजार ००५ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांवर हल्ला होण्याच्या २९२ घटना घडल्या. त्यात ८६१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाउनच्या काळात या फोनवर १,०५,५७७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ७८३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८६,६६३ वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहीतीही अनिल देशमुख यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here