‘मी जबाबदार’ कार्यक्रमात लोकप्रतिनिधीकडूनच सोशल डिस्टंस्टीगचा फज्जा

अंबादास दानवेंसह ग्रामपंचायत सरपंचाकडून नियमांचे उल्लंघन

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन असताना व दिवसा जमावबंदीबंदीचे आदेश प्रशासनाकडून आहेत. तरीही शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याकडून जमावबंदीचे उल्लंघन झाल्याचा प्रकार रांजणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत मी जबाबदार या कार्यक्रमादरम्यान घडला. तसेच कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टंसिंगचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे व यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकप्रतिनिधींकडूनच अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन केले आहे. तेव्हा आता यावर कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र दिवसा जमावबंदी तसेच रात्री संचारबंदीचे आदेश दिले आहेत. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाने मी जबाबदार या कार्यक्रमात आमदार अंबादास दानवे यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मी जबाबदारऐवजी याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एकीकडे कोरोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच असून, सरकारने सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश असतानाही लोकप्रतिनिधींकडून आदेशाची पायमल्ली होत, असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे असे जर होत असेल तर कोरोना रोखायचा कसा? असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like