नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. अशा परिस्थितीत देश आणि राज्य स्तरावर देखील विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. मात्र मागील २/३ दिवसांपासून कमी होत असलेल्या आकडेवारीत आता पुन्हा वाढ झाली आहे. मागील 24 तासात देशात 4,12,262 नवे करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. हि आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक संख्या आहे. तर दिलासादायक बाब अशी की मागील 24 तासात तीन लाख 29 हजार 113 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.
दरम्यान मागील 24 तासात देशात तीन हजार 980 जणांना कोरोनामुळे आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दोन कोटी 10 लाख 77 हजार 410 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी 72 लाख 80 हजार 144 रुग्णांनी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत. तर आतापर्यंत एकूण 23 लाख एक हजार 68 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
लसीकरणाने ओलांडला १६ कोटींचा टप्पा
देशात सध्या 35 लाख 66 हजार 398 जणांवर कोरोनावरील उपचार सुरू आहेत. देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली असून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येत आहे देशात आतापर्यंत 16 कोटी 25 लाख 13 हजार 339 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India reports 4,12,262 new #COVID19 cases, 3,29,113 discharges and 3,980 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,10,77,410
Total recoveries: 1,72,80,844
Death toll: 23,01,68
Active cases: 35,66,398Total vaccination: 16,25,13,339 pic.twitter.com/W1kQnSucGe
— ANI (@ANI) May 6, 2021