नवी दिल्ली । प्रत्येकाला आपले कष्टाने कमावलेले पैसे कुठेतरी गुंतवायचे असते. जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकेल. परंतु बर्याच वेळेला लोकं आपली कमाई केलेली रक्कम अशा ठिकाणी गुंतवणूक करतात जिथे आपण केलेली गुंतवणूक वाचवणे कठीण होऊन बसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला गॅरेंटेड डबल रिटर्न मिळेल. चला तर मग पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र या योजनेबद्दल जाणून घेऊयात…
किसान विकास पत्र योजना काय आहे?
केंद्र सरकार पोस्ट ऑफिस मधून किसान विकास पत्र योजना चालवते. या योजनेत गुंतवणूकदारास गॅरेंटेड डबल रिटर्न दिला जातो. सरकार चालवित असणाऱ्या या योजनेत पैसे बुडण्याची चिंतादेखील नसते. कारण इथे तुमचे पैसे सरकारकडे सुरक्षित आहेत.
तुम्हाला किती काळ गुंतवणूक करावी लागेल?
किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला 124 महिने गुंतवणूक करावी लागेल. ज्यामध्ये आपली गुंतवणूक दुप्पट होते. सरकार या योजनेत 6.9 टक्के व्याज देते. त्याच वेळी, या योजनेमध्ये आपण सिंगल अकाउंट व्यतिरिक्त जॉईंट अकाउंट देखील उघडू शकता.
आपण जास्तीत जास्त आणि किमान किती गुंतवणूक करू शकता ?
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत कोणताही भारतीय किमान 1000 रुपये गुंतवू शकतो तर जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करता येते. परंतु पोस्ट ऑफिसच्या नियमांनुसार या योजनेत गुंतवणूक करणार्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याच योजनेत आपण 1000, 5000 रुपये, 10000 आणि 50 हजार रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट देऊ शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.