‘या’ राज्यात कोरोना योद्धांना मिळणार शहिदाचा दर्जा, राजकीय सन्मानात होणार अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनायक म्हणाले की कोरोना विषाणूच्या लढणार्‍या कोरोना योद्धाचा मृत्यू झाल्यास त्याला शहीदचा दर्जा देण्यात येईल. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्सना ५० लाख रुपयांचा विमा देखील जाहीर केला आहे. पटनायक म्हणाले की, भारत सरकारच्या पुढाकाराने राज्य सरकार हे सुनिश्चित करेल की कोरोनाविरूद्धच्या लढ्यात प्राण गमावलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच इतर आवश्यक सेवांच्या सदस्यांना ५० लाख रुपये देण्यात येतील.नवीन पटनायक म्हणाले की मरण पावलेल्या कोरोना योध्याला राज्य सरकार शहीद मानेल आणि त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन एका पुरस्काराचेही नियोजन केले जात आहे. हे पुरस्कार राष्ट्रीय दिनी देण्यात येतील.

याशिवाय आरोग्य कर्मचार्‍यांवर होणारा कोणताही हिंसाचार ही राज्याविरूद्ध केलेले कृत्य आहे, असा इशारा त्यांनी दिला. जर कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या कामात अडथळा आणल्यास त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या तरतुदींसह कठोर फौजदारी कारवाई केली जाईल.

कोरोना विषाणूंचे आकर्षण केंद्र ठरलेल्या दाट लोकवस्ती असलेल्या तीन उत्तर जिल्ह्यात ओडिशा सरकारने मंगळवारी या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित कृती दल (आरआरटी) बोलावले आणि तज्ञांना पाठविले. बालासोर, भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूची घटना चव्हाट्यावर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणूची ७९ प्रकरणे नोंदली गेली असून यापैकी २३ रुग्ण या जिल्ह्यांमध्ये आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की गेल्या ४८ तासांत कोरोना विषाणूची १७ नवीन प्रकरणे नोंदली गेली. भद्रक आणि बालासोरमध्ये प्रत्येकी आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर सात जाजपूर येथे आहेत.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की तीन जिल्ह्यांत कोरोना विषाणूच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य व कुटुंब कल्याण सचिव एन.बी. ढल यांनी मंगळवारी वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि राज्य रॅपिड अ‍ॅक्शन पार्टिस (आरआरटी) यांना तेथे पावले उचलण्यास सांगितले गेले आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.