Tuesday, January 31, 2023

जाधववाडी येथे शेतकरी मेळावा व शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

- Advertisement -

दहिवडी प्रतिनिधी आकाश दडस

माण तालुक्यातील जाधववाडी येथे शेतकरी मेळावा व शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले या उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून शेतकरी संघटनेचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नांदखीले उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी शेतकरी संघटनेचे पांडुरंग रायते पुणे, जिल्हा अध्यक्ष हनुमंत वीर, पश्चिम महाराष्ट्र युवा युवा आघाडी अध्यक्ष शेतकरी संघटना विकासराव जाधव, अध्यक्ष सातारा जिल्हा राजेंद्र बर्गे उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया सेल केशव जाधव हे बोलताना म्हणाले, यापुढे कर, कर्ज, लाईट बिल, प्राणी प्रश्न व सरकारी दरबारी व सरकारी कार्यालयांमध्ये होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही.

माण तालुक्यातील तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारणीत माण तालुका अध्यक्ष शंकरराव जाधव, शहराध्यक्ष ज्योतीराम जाधव, माण तालुका युवक आघाडी अध्यक्ष सुरज जाधव, माण तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्वप्नाली जाधव, माण तालुका शेतमजूर आघाडी अध्यक्ष धनाजी माने, तालुका शेतकरी सल्लागार अध्यक्ष बाळासाहेब रघुनाथ भोसले, अध्यक्ष अजित जाधव, उपाध्यक्ष गंगाराम निंबाळकर, तालुका शेतकरी चालक संघटना अध्यक्ष दीपक भोसले, महिला अध्यक्ष शालन भोसले, शेतकरी संघटना सचिव प्रमोद जाधव, युवक आघाडी अध्यक्ष ऋषिकेश जाधव अशी विविध पदे शेतकऱ्यांना बहाल करण्यात आली.