कृष्णा सरिता बझारच्या नव्या अद्ययावत दालनाचे उद्‌घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या कृष्णा सरिता बझारच्या नव्या अद्ययावत भव्य दालनाचे उद्‌घाटन विजयादशमीच्या मुहूर्तावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सौ. गौरवी अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, कृष्णा कारखान्याचे संचालक बाजीराव निकम, धोंडिराम जाधव, माजी संचालक जयवंतदादा जगताप, कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कृष्णा सरिता बझारच्या अध्यक्षा डॉ. श्रेया जाधव, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. जी. वरदराजुलु, डॉ. एस. सी. काळे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, अर्चना कौलगेकर, फर्न हॉटेलचे अक्षय सुर्वे, अजय सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सक्षमीकरण व त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृष्णा सरिता महिला बझारची स्थापना करण्यात आली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या संस्थेने सुरू केलेल्या बझारला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. या बझारचा आता विस्तार करण्यात आला असून, कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील नव्या इमारतीत कृष्णा सरिता बझारचे नवे भव्य दालन साकरण्यात आले आहे. पूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या प्रशस्त बझारमध्ये गृहपयोगी सामान व जीवनाश्यक वस्तू, किराणा तसेच नामवंत कंपन्यांची सौंदर्य प्रसाधने व ब्युटी प्रॉडक्ट्स, थाई, इटालियन, चायनीज फूडस्, बेबी केअर प्रॉडक्टस्, फ्रोझन फूड, ब्रँडेड चॉकलेट्स, बेकरी प्रॉडक्ट्स, हेल्थ प्रॉडक्टस्, फ्रूट ज्यूस ॲन्ड क्रश, कोल्ड्रिंक्स, खाद्यपदार्थ, मिठाई, स्नॅक्स, पूजा सामान, सर्व प्रकारचे भारतीय व परदेशी मसाले, डेअरी प्रॉडक्ट्स, आईस्क्रीम्स, डॉग फूड, शालेय गणवेश अशाप्रकारचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी मोकळ्या वातावरणात वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या बझारमध्ये गृहउद्योगांची उत्पादने उपलब्ध राहणार असल्याने यातून मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. सुसज्ज मांडणी व सवलतीसह माफक दर ही या बझारची वैशिष्टये आहेत.

याप्रसंगी कृष्णा सरिता बझारच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री जाधव, संचालिका सौ. कमल पाटील, सौ. अस्मिता पाटील, सौ. सुजाता तलवार, सौ. अर्चना घाडगे, सौ. रेखा जगताप, सौ. अपर्णा पाटील, सौ. स्नेहल घोरपडे, श्रीमती नंदिनी चव्हाण, सौ. शारदा जाधव, सौ. रजनी गुरव, सौ. रजनी गावकर, सौ. जयश्री सोमदे, सौ. वैशाली गावडे यांच्यासह संस्थेच्या सभासद महिला व ग्राहक उपस्थित होते.

Leave a Comment