सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई येथील युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर या घटनेतील चौकशीसाठी पोलिसांनी युवतीला पोलीस ठाण्यात बोलविले होते. त्यावेळी युवतीने पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी हि घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्या युवतीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दोन दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील वाई येथील युवकावर असले येथील हनुमन्त किसन कणसे यांच्या घरात अज्ञात तीन जणांनी दांडक्याने व धारदार शस्त्राने वार केला. त्यामध्ये संबंधित युवक गंभीर जखमी झाला. तिघे मारेकरी त्या युवकाला मारत असताना त्या ठिकाणी संबंधित युवती व तिचे वडील हणमंत कणसे टीव्ही पाहत बसले होते. या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्या युवतीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविले होते.
युवतीला मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीसांकडून ठाण्यातील पोलीस महिला विश्रामगृहात नेण्यात आले. चौकशी सुरु असताना संबंधित युवती पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहात गेली. त्या ठिकाणी त्या युवतीने खिडकीची काच फोडली. तसेच गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. हीचा हा प्रकार स्वछतागृहाबाहेर उभ्या असलेल्या महिला पोलिसांनी पाहताच त्यांनी तत्काळ स्वछतागृहाचा दरवाजा तोडला. तसेच प्रसंगावधान राखून त्या युवतीला पकडले.
त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्या युवतीवर डॉक्टरांनी उपचार केले असता तिच्या गळ्याला आठ टाके पडले पडले. तिला रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर आज पुन्हा तपासातील चौकशीसाठी बोलविण्यात आले. तसेच त्या युवतीवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप भंडारी करीत आहेत.