मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट समाविष्ट करा – संभाजी ब्रिगेड

औरंगाबाद | 5 मे रोजी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज कथा अनेक सामाजिक संघटना निराशा व्यक्त करत आहेत.

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर संभाजी ब्रिगेड या संघटनेने आज औरंगाबाद शहरात पत्रकार परिषद घेतली. पत्रकारपरिषदेत मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट समावेश करून घेण्याची मागणी केली आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका ही केली.

मराठा समाजाची दिशाभूल हे सरकार करत आहे. असे यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी म्हटले उद्या 14 मे रोजी संभाजी ब्रिगेड कडून जिल्हाधिकारी कार्यालय तथा पोलीस आयुक्तालय यांना मराठा आरक्षण बद्दल लोकडाऊन उठल्यानंतर लवकरात लवकर निकाल लावला. नाही तर संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदोलन महाराष्ट्रभरात संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात येईल असे निवेदनही देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत दरम्यान संभाजी ब्रिगेडने अनेक मागण्या मराठा आरक्षणाबद्दल केल्या आहेत. त्यामध्ये प्रमुख म्हणजे मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट समावेश करा आणि गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारावा ह्या दोन मागण्या आहेत. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे तथा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

You might also like