औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद-जालना या दोन जिल्ह्यात सह अठरा जिल्ह्यांचा समावेश अनलॉक मध्ये केला आहे. ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा अनलॉक एकमध्ये समावेश केला आहे.
रेस्टॉरंट, मॉल, सिनेमागृहे, उद्याने, वॉकिंग, क्रीडा संकुले, ट्रेडिंग, खासगी, सरकारी कार्यालय, शूटिंग, सार्वजनिक बससेवा, सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळे, ई-कॉमर्स आधी सुरू होणार. सोबत जमाबंदी राहणार नाही, आंतरजिल्हा प्रवासाची मुभा असेल तर इतर राज्यातून येणाऱ्या काही निर्बंध असतील.
अनलॉक 2 : 6 जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार
6 जिह्यात काय सुरू राहील?
हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृहे, जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50% क्षमतेने सुरू होणार, उद्याने, सार्वजनिक जागा, खुली मैदान, मॉर्निंग वॉक, सायकलिंग सुरू होणार, खासगी व शासकीय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार, खासगी व शासकीय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार, क्रीडा संकुले (इनडोअर व आउटडोर) पहाटे 5 ते सायंकाळी 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार. आंतरजिल्हा बंदी नसेल. ई-पासची गरज नाही. रेड झोन जिल्ह्यात जाण्यास किंवा येण्यास ही पास लागेल. मालिका व चित्रपटांचे शूटिंग सुरू होणार, बैठका, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका आदीसाठी शंभर व्यक्तीची मुभा, मंगल कार्यालय, हॉलमध्ये शंभर लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करता येणार, अंत्यविधी सोहळ्यासाठी सगळ्यांना उपस्थित राहता येईल, बांधकाम शेतीशी संबंधित सर्व दुकाने, सार्वजनिक बस 100% क्षमतेने सुरू होणार.
अनलॉक 3 : 10 जिल्हे
कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बीड, उस्मानाबाद.
10 जिल्ह्यात काय सुरू राहील?
अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहतील. इतर दुकाने शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद राहतील. मॉल्स, सिनेमागृह हे पूर्णपणे बंद राहणार. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50% क्षमतेने दुपारी दोन पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल सुविधा उपलब्ध. शनिवार व रविवार हॉटेल्स पूर्णपणे बंद राहतील.