औरंगाबाद : शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 17 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 26 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 82 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 329 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 38 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 17 आणि ग्रामीण मधील 45 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील नाशिक रोड परिसरात 1, उल्का नगरी 2, ठाकरे नगर 1,गोलटगाव 1,एन बारा आणि हडको 1, घाटी परिसर 1,अन्य 2 रुग्ण आढळले आहे.

ग्रामीण भागातील औरंगाबाद 1,गंगापूर 5, कन्नड 1, वैजापूर 9,पैठण 1 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर घाटी मध्ये पोरगाव, पैठण येथील 35 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment