टीम, HELLO महाराष्ट्र । भारतीयांच्या मनावर राज्य केलेल्या बाहुबली चित्रपटातील बाहुबली सह भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती देखील सर्वांच्याच लक्षात आहे. या राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू यांच्या घर आणि स्टुडिओसह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने बुधवारी छापे मारी केलीये.
टॉलीवूड्चे निर्माते असणाऱ्या दग्गुबाती सुरेश बाबू यांचा हैदराबादमध्ये रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. आयकर विभागाने या स्टुडिओसह त्यांच्या हैदराबादच्या निवासस्थानीही छापा मारल्याची माहिती समोर येतीये. छापे मारल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रेही तपासली आहेत. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलीये. या संदर्भात दग्गुबाती सुरेश बाबू यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नहिये.
दरम्यान सुरेश बाबू हे टॉलिवूडचे मोठे निर्माते म्हणून ओळखले जातात. ते निर्माते दग्गुबाती रामानायडू यांचे पूत्र आहेत. त्यांनी सुरेश प्रॉडक्शनची सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 150 सिनेमांची निर्मिती केली आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये काही थिएटरही असल्याची माहिती समोर येतीये. जेंव्हा आयकर विभागाचा छापा पडला तेव्हा सुरेश बाबू परदेशात असल्याचे समजते.