इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिला शेवटचा इशारा, लवकरात लवकर करा ‘हे’ काम अन्यथा निष्क्रिय होईल Pan Card

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Pan Card आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे बनले आहेत. अनेक महत्वाच्या कामांमध्ये याचा वापर अनिवार्य झाला आहे. याबरोबरच अनेक सरकारी योजनांचा लाभ देखिल याशिवाय घेता येणार नाही. मात्र, आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केलेल्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे. एका ताज्या एडवायझरीनुसार, जर आपले Pan Card  31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होईल. कारण या तारखेनंतर अशा लोकांना आपले पॅन कार्ड वापरता येणार नाही.

How to get a duplicate PAN card online: Simple step-by-step guide

आयटी कायद्यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत Pan Card आधारशी लिंक न केल्यास ते निष्क्रिय ठरणार आहे. ज्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून ते कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही. इथे हे लक्षात घ्या कि, आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालयातील लोकांना यामधून सूट देण्यात आली आहे. याशिवाय 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही यामधून सूट देण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 31 मार्च 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची मुदत दिली आहे.

How to link PAN card with Aadhaar number | Deccan Herald

अशा प्रकारे आपले आधार आणि पॅन कार्ड लिंक करा

सर्वात आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जा.
यानंतर पेजच्या डाव्या बाजूला ‘Quick links’ चा पर्याय दिसेल.
‘Link Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.
पॅन, आधार क्रमांक आणि नाव टाका.
ही माहिती दिल्यानंतर एक OTP पाठवला जाईल.
OTP टाकल्यानंतर आधार आणि पॅन लिंक होईल.

PAN Card, Aadhaar Card Linking Deadline Is June 30: How to Check Status,  Link Aadhaar-PAN Online | Technology News

पॅन-आधार लिंक आहे की नाही ते अशा प्रकारे तपासा

http://www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
शीर्षस्थानी असलेल्या ‘Quick links’ हेडवर जा आणि ‘Link Aadhaar’ वर क्लिक करा.
यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.
या पेजच्या वरच्या बाजूला एक हायपरलिंक असेल ज्यामध्ये असे दिसेल की, आधीच आधार लिंक करण्याची विनंती केली आहे, त्यामुळे स्टेटस जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हायपरलिंकवर क्लिक केल्यानंतर पॅन आणि आधार डिटेल्स एंटर करा.
आता ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. यानंतर आपला Pan Card आधारशी लिंक आहे की नाही ते कळेल.

हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या