Income Tax Department कडून पॅन कार्डधारकांना इशारा, लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Income Tax Department कडून पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या लोकांना इशारा देण्यात आला आहे. यावेळी डिपार्टमेंटने पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्ड नंबरशी जोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच जर या मुदतीपूर्वी पॅन आधारशी लिंक केले नाही तर आपले पॅन कार्ड डिएक्टीव्हेट होऊ शकते. तसेच आता पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

Income Tax Department ने एका ट्विटद्वारे लोकांना आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे. या ट्विटमध्ये डिपार्टमेंटने म्हटले की, आता इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार, सर्व पॅन धारकांना 31 मार्च 2023 पूर्वी आपले पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

Income Tax Department conducts searches in Uttar Pradesh | DD News

अशा प्रकारे ऑनलाइन करा लिंक

>>सर्वात आधी Income Tax Department च्या वेबसाईटवर जा.
>> आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर टाका.
>> आधार कार्डमध्ये फक्त जन्माचे वर्ष दिले असल्यास चौकोनावर टिक करा.
>> आता कॅप्चा कोड टाका.
>> आता Link Aadhaar बटणावर क्लिक करा
>> यानंतर पॅन आधारशी लिंक केला जाईल.

PAN Card, Aadhaar Card Linking Deadline Is June 30: How to Check Status, Link  Aadhaar-PAN Online | Technology News

अशा प्रकारे SMS द्वारे करा लिंक

SMS द्वारे लिंक करण्यासाठी आपल्याला फोनवरून UIDPAN असे टाइप करावे लागेल. यानंतर आपला 12 अंकी आधार नंबर लिहा. त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर लिहा. आता स्टेप 1 मध्ये नमूद केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.

अशा प्रकारे निष्क्रिय पॅन सक्रिय करा

आपले निष्क्रिय झालेलं पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी एक एसएमएस पाठवावा लागेल. यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवरून 10-अंकी पॅन नंबर टाकावा लागेल, त्यानंतर स्पेस देऊन 12-अंकी आधार नंबर टाकावा लागेल आणि 567678 किंवा 56161 वर SMS पाठवावा लागेल.

Have not linked your PAN card with Aadhaar? Follow step-by-step guide to do  it online

पॅन कार्ड आधारशी लिंक का करावे ???

हे जाणून घ्या कि, देशातील लोकांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी सरकारकडून पॅन कार्डचा वापर केला जातो. जे Income Tax Department कडून जारी केले जाते. हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमद्वारे काम करते. कोणत्याही व्यक्तीची किंवा कंपनीची टॅक्सच्या संबंधातील सर्व माहिती एकाच पॅन नंबरमध्ये नोंदवली जाते. PAN हा डेटा साठवण्याचे काम करते.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx

हे पण वाचा :
PhonePe ने सुरु केली आधार कार्डद्वारे UPI रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा !!!
Budget Cars : कार घेताय… जरा थांबा, ‘या’ बजट कारचे फीचर्स अन् किंमत तपासा
गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 573% रिटर्न
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी
Flight Ticket Offer : फक्त ₹ 6,599 मध्ये परदेशात तर ₹ 1199 मध्ये देशभर प्रवास करण्याची संधी !!! ‘या’ कंपनीने सुरु केली धमाकेदार ऑफर