हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : आजपासून नवीन महिना सुरु होतो आहे. या महिन्यापासून आता अनेक नवीन आर्थिक बदल देखील लागू करण्यात आले आहेत. यामध्ये इन्कम टॅक्स, टीडीएस कपात आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित नियमांचा समावेश आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
डीमॅट खाते बंद केले जाईल
शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करणाऱ्यांनी आपल्या डिमॅट खात्याचे KYC केले नसेल तर 1 जुलैपासून ते वापरता येणार नाही. आता KYC न केलेली खाती 10 दिवसांच्या आत बंद केली जातील. Income Tax
आधार-पॅन लिंक
करदात्यांच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपण अजूनहीआधार आणि पॅन लिंक केले नसेल तर आजपासून त्यासाठी दुप्पट दंड द्यावा लागणार आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक केला नाही तर ते इनव्हॅलिड मानले जाईल. तसेच आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही. 1 जुलै ते 31 मार्च 2023 पर्यंत यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल.Income Tax
डॉक्टर, इंफ्लूएंशर्सनाही TDS लागू
1 जुलैपासून TDS चा नवा नियम डॉक्टर आणि इंफ्लूएंशर्ससाठीही लागू झाला आहे. आता डॉक्टरांना कंपनीकडून मिळणाऱ्या फ्री गिफ्ट्सवर टॅक्स भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे, यूट्यूबर्सना कंपन्यांकडून मिळालेल्या रकमेवर टीडीएस देखील भरावा लागेल, तर सोशल मीडियावर इंफ्लूएंशर्सना देखील कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या मोबाईल, कार इत्यादी उत्पादनांवर 10 टक्के टॅक्स भरावा लागेल. मात्र, कंपन्यांकडून मिळालेली उत्पादने परत केल्यास त्यावर टॅक्स आकारला जाणार नाही. Income Tax
क्रिप्टोकरन्सीवर TDS
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजपासून टॅक्स -संबंधित एक मोठा नियम लागू झाला आहे. आता क्रिप्टो गुंतवणूकदारांना कोणत्याही ट्रान्सझॅक्शनवर 1 टक्के TDS भरावा लागेल. म्हणजेच गुंतवणूकदाराला नफा असो किंवा तोटा असो केलेल्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर 1 टक्के TDS भरावा लागेल. Income Tax
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : आयात शुल्कात वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन भाव तपासा
Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत
LPG Cylinder Price : दिलासादायक!! LPG गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर
LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे भरून आयुष्यभर मिळवा पेन्शन !!!
अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!