Income Tax Notice : जर आपण करताय ‘हे’ 5 प्रकारचे ट्रान्सझॅक्शन तर आयकर विभागाकडून मिळू शकेल नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कॅश ट्रान्सझॅक्शनबाबत अत्यंत सावध झाले आहे. आता आपण एखादी फसवणूक केली तरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस येईल, असे नाही. गेल्या काही वर्षांत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि बँका, म्युच्युअल फंड हाऊस, ब्रोकर्स इत्यादीसारख्या विविध गुंतवणूक प्लॅटफॉर्मने सामान्य लोकांसाठीच्या कॅश ट्रान्सझॅक्शनचे नियमांत कडकपणा आणला आहे. आता या गुंतवणूक आणि कर्ज देणाऱ्या संस्थाकडून एका ठराविक मर्यादेपर्यंतच कॅश ट्रान्सझॅक्शन्सना परवानगी दिली जात आहे. यामध्ये जरासाही हलगर्जीपणा झाल्यास इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून नोटीस पाठवली जाऊ शकेल.

Income-Tax department to share account data with intel, probe agencies |  Business News,The Indian Express

सर्वसाधारणपणे फसवणूकीवरच Income Tax डिपार्टमेंटचे लक्ष असते असे नाही. असे अनेक व्यवहार आहेत ज्यांवर देखील डिपार्टमेंट नजर ठेवून असते. जर आपण बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांच्यासोबत मोठे कॅश ट्रान्सझॅक्शन्स करत असाल तर त्याबाबतची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागेल.जर आपण अशाच 5 ट्रान्सझॅक्शनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे आपण अडचणीत येऊ शकाल.

बँकेची एफडी

कोणत्याही बँकेच्या एफडीमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट नसावे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने जाहीर केले आहे की,” एक किंवा जास्त फिक्स्ड डिपॉझिट्समधील वैयक्तिक ठेवी या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहेत की नाही हे बँकांना उघड करावे लागतील.” Income Tax

Income Tax Notices - How to Deal with Income Tax Notice of Assessment |  HDFC securities

मालमत्तेची खरेदी किंवा विक्री

हे जाणून घ्या कि, कोणत्याही प्रॉपर्टी रजिस्ट्रारला 30 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या स्थावर मालमत्तेची कोणत्याही गुंतवणूक्रीची किंवा विक्रीची माहिती टॅक्स अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. म्हणून, कोणत्याही रिअल इस्टेट मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करताना करदात्यांना आपल्या कॅश ट्रान्सझॅक्शनची माहिती फॉर्म 26AS मध्ये द्यावी लागेल, कारण प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडून निश्चितपणे तसा रिपोर्ट दिला जाईल. Income Tax

बँकेचे बचत खाते ठेव

कोणत्याही बँकेच्या खात्यामध्ये कॅश जमा करण्याची मर्यादा 10 लाख रुपये आहे. जर एखाद्याने आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस पाठवली जाऊ शकते. यादरम्यान, एका आर्थिक वर्षामध्ये 10 लाखांची मर्यादा ओलांडणाऱ्या बँकेच्या खात्यामध्ये कॅश डिपॉझिट्स करणे अथवा पैसे काढण्याची माहिती टॅक्स अधिकाऱ्यांना द्यायला हवी. तसेच चालू खात्यांमध्ये ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे.

Online Correspondence of Tax Notice: Real-time coordination with the Tax  body:

क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट

CBDT च्या नियमांनुसार, जर एखाद्याने आपल्या क्रेडिट कार्डच्या बिल म्हणून एक लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचे पेमेंट केले तर तर Income Tax डिपार्टमेंटच्या कक्षेत येईल. याव्यतिरिक्त, क्रेडिट कार्ड बिल सेटल करण्यासाठी आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्त पैसे भरल्यास ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे उघड केले पाहिजे.

म्युच्युअल फंडस् आणि शेअर्समधील गुंतवणूक

म्युच्युअल फंड, स्टॉक, बाँड किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या गुंतवणुकीतील आपले कॅश ट्रान्सझॅक्शन एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त होणार नाहीत याची खात्री करावी. कारण आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांच्या हाय व्हॅल्यू कॅश ट्रान्सझॅक्शनचा शोध घेण्यासाठी आर्थिक ट्रान्सझॅक्शनचे एन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न (AIR) तयार करण्यात आले आहे. या आधारावर टॅक्स अधिकारी विशिष्ट आर्थिक वर्षात असामान्य हाय व्हॅल्यू ट्रान्सझॅक्शनचे डिटेल्स गोळा करतील. Income Tax

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx

हे पण वाचा :
PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!
अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण
adhaar Card Pan Card Link : ‘या’ लोकांना आधारशी पॅन लिंक करणे बंधनकारक नाही, सरकारकडून देण्यात आली सूट
Business Idea : आठवड्यात 1 सौदा झाला तरी थेट 30 हजार खिशात, ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा हजारो रुपये
Bank FD : खुशखबर !!! आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या FD वर ग्राहकांना मिळणार 9.50% व्याज