टीम हॅलो महाराष्ट्र । मुंबई उपनगर ठाण्यातील अंबिवली येथील झोपडपट्टी राहणारे बाबूसाहेब अहीर ३०० रुपये रोजंदारी कमावतात. मात्र, आयकर विभागाने अहिर यांना पाठविलेली नोटीस पाहून अहिरच नाही तर कोणालाही धक्का बसेल. आयकर विभागाने मजुरी करणाऱ्या १.०५ कोटी रुपयांची आयकर भरण्याची नोटीस पाठविली आहे. नोटाबंदीच्या वेळी अहिरच्या बँक खात्यात ५८ लाख रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बाबूसाहेब अहीर यांना बँक खात्याची माहितीच नाही
आयकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर बाबूसाहेब अहीर यांनी ठाणे पोलिसांत तक्रार दिली आहे. अहीर म्हणतात की, ”माझ्या नावाच्या ज्या बँक खात्यात ५८ लाख रुपये जमा केले गेले आहेत, त्यांच्याविषयी माहिती नाही. अहीरच्या म्हणण्यानुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे एखाद्याने त्यांच्या नावावर बँक खाते उघडले आहे. बाबूसाहेब त्यांच्या सासरच्या कुटुंबासोबत झोपडीत राहतात. अहीर म्हणाले की, सप्टेंबर २०१६ मध्ये नोटीसच्या माध्यमातून मला कळले की नोटाबंदीच्या वेळी l५८ लाख रुपये खासगी बँकेत त्यांच्या नावावर उघडण्यात आलेल्या खात्यात जमा झाले.