पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Income Tax Department
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax डिपार्टमेंटचे पोर्टल वापरताना येत असलेल्या तांत्रिक समस्यांबाबत अनेक युझर्सनी तक्रार केली आहे. यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आयटी कंपनी इन्फोसिसला ई-फायलिंग पोर्टलमधील ‘सर्च’ ऑप्शनमध्ये येणाऱ्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे डिपार्टमेंटने सांगितले आहे.

एका बातमीनुसार, Income Tax डिपार्टमेंटने मंगळवारी सांगितले की, आजही पोर्टलवर डेटा ब्रीच बाबतच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पोर्टल लाँच झाल्याच्या पहिल्याच वर्धापनदिनानिमित्त ही बाब उघडकीस आली. आता इन्फोसिसकडून त्यावर तोडगा काढण्याचे कामही सुरु असल्याचे डिपार्टमेंटने यावेळी सांगितले.

Income tax refunds of Rs 1.71 lakh crore released till 14th Feb - Jammu  Kashmir Latest News | Tourism | Breaking News J&K

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने twitter वर सांगितले कि…

Income Tax डिपार्टमेंटने ट्विटरवर सांगितले की, ई-फायलिंग वेबसाइटच्या ‘सर्च’ ऑप्शनमध्ये येत असलेली समस्या आमच्या निदर्शनास आली आहे. डिपार्टमेंटने इन्फोसिसला त्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच ते प्राधान्याने दुरुस्त करण्यात येत असल्याचेही डिपार्टमेंटने यावेळी म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, पोर्टलवरील डेटामध्ये कोणतीही गडबड झालेली नाही. यावेळी कोणत्याही प्रकारचे डेटा ब्रीच झालेले नाही.

Filed your income tax return? Here's how to verify it | Mint

गेल्या वर्षी मुदत वाढवून द्यावी लागली

7 जून म्हणजेच मंगळवारी नवीन इन्कम टॅक्स पोर्टल लाँच करण्याचा पहिला वर्धापन दिवस होता. हे लक्षात घ्या कि, 7 जून 2021 रोजी नवीन ई-फायलिंग पोर्टल http://www.incometax.gov.inलाँच करण्यात आले. गेल्या वर्षी देखील अशा अनेक समस्या येत असल्याचे युझर्सनी सांगितले होते. यानंतर सरकारने करदात्यांना टॅक्स रिटर्न आणि इतर फॉर्म भरण्यासाठी वेळ वाढवून दिला होता. 2019 मध्ये देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसला हे नवीन इन्कम टॅक्स पोर्टल तयार करण्याचे काम देण्यात आले होते.

Income-Tax department to share account data with intel, probe agencies |  Business News,The Indian Express

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/

हे पण वाचा :

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!

Investment : लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे कसे फायदेशीर असते ??? अशा प्रकारे समजून घ्या

HDFC चा ग्राहकांना धक्का !!! सात दिवसांत दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याज दरात वाढ

आपले हरवलेले SBI Card घरबसल्या कसे ब्लॉक करावे हे जाणून घ्या