मुंबईचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी; शिवसेनेला धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे असा आरोप सातत्याने महाविकास आघाडी कडून होत असतानाच आता अजून एका शिवसेनेच्या नेत्याच्या घरी इनकम टॅक्स च्या धाडी पडल्या आहेत. मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्स चे अधिकारी पोहोचले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे

यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळेच आयकर विभागाने ही धाड टाकली असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाशेजारी महाविकासआघाडीचे जे धरणे आंदोलन झाले होते त्यामध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. त्याच्याच दुसऱ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी धाड पडल्याने राजकीय वर्तुळाच्या खळबळ उडाली आहे.