औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाचे नियम शिथिल केले जात आहे. तरीही नागरिकांना लॉकडाऊनमूळे हवा तेवढा रोजगार मिळत नाही. त्याचबरोबर नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढे येत नसल्यामुळे छुपी बेरोजगारी वाढते आहे. ऑनलाइनच्या जगात आता बेरोजगारांना गंडविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोरोनामूळे आता सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. यामुळे डमी वेबसाईट वर अनेकांची नजर जाते एडमिन वेबसाईट कडे काही जण दुर्लक्ष करतात तर काही यामध्ये फसतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी सर्व कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही टेक्निक वापरली होती. यामुळे सर्व उद्योग धंदे ऑनलाइन केले जात होते. याचमुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले. ऑनलाइन केवायसी भरून देण्यात प्रॉब्लेम येत असल्याचे सांगून बेरोजगारांना गंडविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ऑनलाइन ऑफरची अशी करा खातरजमा ऑनलाइन नोकरीची ऑफर आल्यास कामाचे स्वरूप काय आहे. किती काम करावे लागेल. याबाबत स्पष्टता तपासा. कंपनीची पूर्ण माहिती संकलित करा. त्यातील अटी व शर्ती पूर्णपणे वाचून घ्या. केवायसीच्या नावाने डॉक्युमेंट घेत असताना काळजीपूर्वक माहिती घ्या. करार करण्यापूर्वी ऑनलाइन ऐवजी समक्षपणे भेटूनच चर्चा करा.
दोन तक्रारी झाल्या आहेत दाखल
‘ऑनलाइन जॉब देण्याच्या जाहिरातींमधील अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचून विचार करावा, सायबर सेलकडे फसवणुकीच्या दोन तक्रारी सध्या दाखल करण्यात आलेल्या असून, मागील वर्षभरात अशा फसवणुकीचा ट्रेंड आला आहे. ऑनलाइन केवायसी अर्ज केल्यानंतर त्यात त्रुटी दाखवून बेरोजगारांना संस्थांकडून ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा जाहिरातींची खातरजमा करणे गरजेचे आहे. असे
पोलीस आयुक्तालय पोलीस निरीक्षक सायबर सेल, गीता बागवडे यांनी सांगितले.