एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचण्यांत वाढ; पॉजिटीव्ह येण्याचे प्रमाण मात्र शून्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या भीतीने मनपा प्रशासनाने कंबर कसली असून, याच अनुषंगाने शहरच्या एन्ट्री पॉइंटवर चाचण्या वाढवल्या आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात 7 हजार 86 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये एकही रुग्ण कोरोना बाधित आढळून आलेला नाही. असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मांडलेला यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात दररोज सरासरी 10 ते 15 व्यक्ती पॉजिटीव्ह येत आहेत. त्यामुळे शहरातील कोविड सेंटर बंद झाले आहेत. दरम्यान ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे शहरात वाहनांद्वारे येणाऱ्या नागरिकांची एन्ट्री पॉइंटवर अँटीजेन चाचणी केली जात आहे. त्यामध्ये रोज दीड हजार नागरिकांची चाचणी केली जात आहे. यात पॉजिटीव्ह येण्याचे प्रमाण मात्र शून्य आहे.

काल सोमवारी देखील चिखलठाणा येथे 199, हर्सूल टी पॉईंट 186, कांचनवाडी 151, झाल्टा फाटा 166, नागर नाका 147, दौलताबाद टी पॉईंटवर 210 अशी एकूण 1 हजार 59 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात एकही रुग्ण पॉजिटीव्ह आलेला नाही.

मागील आठवड्यातील चाचण्या –
मंगळवार – 1349, बुधवार 1533, गुरुवार 1565, शुक्रवार 1405, शनिवार 1234 अशा एकूण 7 हजार 86 जणांच्या अँटीजेन कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment