Tuesday, January 31, 2023

राज्यात लॉकडाऊन वाढवणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या काहीशी कमी येत असली तरी कोरोनावरील उपचार करताना आरोग्य सुविधांचा तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे. ठाकरे सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता त्यानंतर लॉकडाऊन हा मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या लॉकडाऊन मध्ये आणखी 31 मे पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी बोलताना टोपे म्हणाले, उद्या कॅबिनेट मिटिंग असण्याची संभावना आहे. अद्याप त्या संदर्भात सूचना आलेली नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करून लॉकडाउन बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहे ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींचा संदर्भात निर्णय घेतले जाऊ शकतात असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पुढे बोलताना ते म्हणाले, यावेळी लगेच पूर्ण लॉकडाऊन हटवला जाईल अशी अपेक्षा करू नका. सगळं लगेच 100% कमी होणार नाहीत हळूहळू निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असा माझा अंदाज आहे. पण पुर्ण लॉक डाऊन काढून 100% मोकळे होईल असं होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं.